‘न्यूटन’ : नक्षली आणि फौजेच्या चिमटीतली लोकशाही
दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतींना स्वातंत्र्य द्यावं लागणार हे मान्य करणं पाश्चात्त्य जगाला भाग पडलं. तरीही, लोकशाही तिथे कितपत टिकाव धरू शकेल, याबद्दल चर्चिलपासून अनेकांना शंका होत्या. स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या गोऱ्या पुरुषांमधली वंशश्रेष्ठत्वाची भावना हे त्यामागचं मुख्य कारण होतं. मात्र, अगदी आपल्या शेजारी देशांतही लोकशाही प्रक्रिया रुजवण्याआड मोठे अडथळे आहेत, हे आजमितीला मान्य करावंच लागेल. लोकशाही टिकवण्यात भारताला मिळालेलं यश ह्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं. तरीही, सणसणीत ७० वर्षं जगलेली भारतीय लोकशाही निर्दोष नाही. आपल्या समाजवास्तवातल्या गुंतागुंतीचं प्रतिबिंब लोकशाही प्रक्रियेतही पडणं स्वाभाविक आहे. सिनेमासारख्या जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून ही गुंतागुंत चितारण्याची आकांक्षा बाळगणारी ‘न्यूटन’सारखी कलाकृती म्हणूनच बहुचर्चित होते. त्यातच ती ऑस्करसाठी पाठवली गेल्यामुळे वादविवादप्रिय भारतीय ‘न्यूटन’बद्दलच्या मतमतांतरांचा पाऊस पाडत आहेत. त्यामुळे चित्रपटाची चिकित्सा अपरिहार्य झाली आहे.
मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणाऱ्या शहरी प्रेक्षकांमधला एक सुजाण गट डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहण्यापेक्षा आणि काहीशे कोटी कमावण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सिनेमाचा गल्ला भरण्यापेक्षा वेगळ्या सिनेमाची अपेक्षा ठेवतो. ह्या प्रेक्षकासाठीचा सिनेमा कसा असावा ह्याचीही काही गणितं आताच्या बाजारशरण जगात एव्हाना ठरून गेली आहेत. मध्यवर्ती कथाकल्पना नावीन्यपूर्ण असली तर अशा सिनेमाला त्याचा फायदा होतो. ह्या कसोटीवर ‘न्यूटन’ नक्कीच उतरतो. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी ज्या सरकारी नोकरांवर टाकली जाते त्यांपैकी एक नवखा कारकून न्यूटन (राजकुमार राव) नक्षलग्रस्त आदिवासी इलाख्यात धाडला जातो. नक्षलींनी निवडणूकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलेलं असतं. नक्षलींच्या निर्दालनासाठी सरकारनं फौज तैनात केलेली असते. एकीकडे नक्षली हल्ल्याचा धोका, दुसरीकडे फौजेची धडक शैली आणि ह्या दोन्हींमध्ये सापडलेले आदिवासी अशा वातावरणात मतदानाच्या दिवशी लोकशाहीचं काय होतं, ह्याचं चित्रण ‘न्यूटन’ करतो. असा विषय सिनेमासाठी निवडण्यात कल्पकता नक्कीच आहे.

Reviewed by Unknown
on
Monday, February 05, 2018
Rating: 5